गोव्यातील निवडणुका जसजश्या जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे, सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, या दरम्यान महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षा संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मगोचे चीफ सुदिन ढवळीकर यांनी भाजप सोबत युतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, मागील आठवड्यात ढवळीकर यांना मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पाहिले गेले होते अशी खात्रीपूर्वक बातमी आमच्या सूत्रांकडून मिळाली आहे ,मिळालेल्या माहितीनुसार ढवळीकर यांनी 8 सीटांसाठी भाजप सोबत बोलणी सुरू केली आहे त्याच बरोबर त्यांनी भाजप समोर आपल्या अजूनही मागण्या सोमोर ठेवल्या आहेत यातील मुख्य म्हणजे :
१.ढवळीकर यांनी स्वतःसाठी भाजप ची खासदारकी किंवा कोणत्याही राज्याचे राज्यपाल पद देण्याची अट ठेवली आहे
2.आपल्या मुलासाठी मडकई ची सीट
3.आपल्या भावासाठी प्रियोळ ची सीट
4.यातील मुख्य मागणी म्हणजे गोविंद गावडे ,दिपक पावसकर आणि बाबू आजगावकर यांना भाजपने तिकिट देऊन नये ही सुद्धा आहे
भाजपने या सर्व मागण्या मान्य केल्या तर मगो 5 जागांवर वर युती करण्यास तयार आहेत ,या पाच जागा आहेत पेडणे शिरोडा मडकई प्रियोळ आणि सावर्डे
सुदिन ढवळीकर यांनी या आधी देखील भाजप सोबत निवडणूक लढवली आहे आणि जसजश्या निवडणुका जवळ येत आहे तसे मगो पुन्हा भाजप सोबत निवडणूक रिंगणात उतरणार
या परिस्थितीत मगो च्या बाकी नेत्याचे काय होणार ? जित आरोलकर केतन भाटीकर सारख्या युवा नेत्यांनी अहोरात्र झटून पक्षाचे काम केले त्यांचं काय होणार?