News

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर, शिळा मंदिराचे देहू येथे आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लोकार्पण केले

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर, शिळा मंदिराचे देहू येथे आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लोकार्पण केले.
आमच्या विनंतीला मान देत या कार्यक्रमासाठी आपण वेळ दिलात आणि संतांच्या, वारकर्‍यांच्या दर्शनाला आलात, मी आपला अत्यंत आभारी आहे.
॥ राम कृष्ण हरी ॥

देहूतील उत्साह आज अनुभवण्यासारखा होता.
मला या सोहोळ्याला उभे राहता आले, हे मी माझे भाग्य समजतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अतिशय सुरेख मार्गदर्शन यावेळी केले. जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे विविध अभंग आणि त्यादिशेने होत असलेली वाटचाल त्यांनी मांडली.

राष्ट्र, समाजाची गरज आणि अध्यात्मिक संकल्पातून विविध लोकोपयोगी कामे, पालखी मार्ग, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ, येणार्‍या काळातील आंतरराष्ट्रीय योगदिवस अशा नानाविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रख्यात वारकरी संत श्री मारूती बाबा कुरेकर महाराज, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले आणि इतर यावेळी उपस्थित होते.

Ad Blocker Detected!

Kindly Turn Off Ad Blocker. We Post content for you and to earn bread and butter we put Ads.

Refresh